सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ सर्वोत्तम ; दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T -20 सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या संघाने तब्बल 8 गडी राखून भारतीय संघावर दिमाखदार विजय मिळवला. दरम्यान इंग्लंडच्या या विजयानंतर माजी इंग्लिश खेळाडू मायकल व्हॉन ने भारतीय संघाला टोला लगावला आहे.

संदर्भात एक ट्विट करत तो म्हणाला की सध्याच्या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ उत्तम आहे. मायकल व्हॉन नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्या काही वक्तव्यामुळे तो चाहत्यांचा रोष ओढवून घेत असतो.

दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम वर इंग्लंडच्या संघाने भारताला चारी मुंड्या चित केले. जेसन रॉय आणि जोस बटलरच्या आक्रमक फलंदाजीने इंग्लंडने पहिला T 20 सामना एकहाती जिंकला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment