आपली पोरं भारी, आपली टीम भारी ; पहा मुंबई इंडियन्सचे मराठमोळं गाणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2021 च्या दुसऱ्या हंगामाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलकडे सर्वांचे लक्ष लागलेल असून सर्व संघांनी दुबईला जाऊन आपल्या सरावाला सुरुवात देखील केली आहे. याच दरम्यान आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्सने आपलं नव गाणे तयार केले आहे.

आपली पोरं? भारी, आपली टीम? भारी अस म्हणत महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान म्हणजे मुंबई इंडिअन्स असा नारा देण्यात आला आहे. संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे मराठी गाणे लाँन्च करण्यात आले. चला पलटण, आयपीएल २०२१ मध्ये होऊन जाऊ द्या आपलाच आवाज,’ असे लिहिले दिले आहे.

या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पंड्या फेटा घातलेले दिसून येत आहेत. तर, संघातील इतर खेळाडू नृत्य करताना दिसतायेत. मुंबई इंडियन्सच्या संघमालकीण नीता अंबानी यांनीदेखील आपल्या चाहत्यांना मराठीतून संदेश दिला.

दरम्यान, मुंबई इंडिअन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा चे कल्पक नेतृत्व, दर्जेदार युवा भारतीय खेळाडू आणि दमदार अष्टपैलू ही नेहमीच मुंबईची ताकद राहिली आहे.

Leave a Comment