मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत – रोहित शर्मा

0
45
Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडिअन्सने पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरले. कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक कऱण्यात येत आहे.परंतु रोहितला एका गोष्टीची खंत आहे.मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत रोहितला आहे.

सांघिक खेळाच्या जोरावर मुंबई पुन्हा एकदा चॅम्पियन बनली पण रोहित म्हणतो , संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीच, पण कोरोनाकाळात अशी स्पर्धा भरवण्यासाठी पड्यदामागील कर्मचाऱ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. असे रोहित म्हणाला.

मुंबईने विजेतेपद मिळवलं यात सूर्यकुमार, इशान, पोलार्ड, पांड्या बंधू.. साऱ्यांनीच अप्रतिम कामगिरी करून दाखवली, पण आम्ही आमच्या चाहत्यांना खूप मिस केलं. दुर्दैवाने चाहते सामना पाहायला येऊ शकले नाहीत. पण त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. चाहतेच स्पर्धेला खास स्वरूप देता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळायला मिळालं नाही याची खंत आहे”, अशा शब्दात रोहितने प्रेमळ नाराजी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here