हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई इंडिअन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. T-20 क्रिकेट मध्ये सर्वांत आधी 100 विजय मिळवणारा जगातील पहिला संघ म्हणून मुंबई इंडिअन्सच नाव जगभर ओळखलं जातं. कोरोना मुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा रनसंग्राम होणार आहे. मुंबईच्या संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबईचा संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या चमूत ७ फलंदाज, ९ गोलंदाज, ३ विकेट किपर आणि पाच अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. पाहूयात मुंबईच्या संघातील शिलेदार….
फलंदाज – रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे (विकेटकिपर), अनमोलप्रीत सिंग, ख्रीस लीन, इशान किशन (विकेटकिपर), मोहसीन खान, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, शेर्फन रुदरफोर्ड
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, जेम्स पैटिनसन, दिगविजय देशमुख, जयंत यादव, मिचेल मॅक्लेनघन, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट
अष्टपैलू – हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्रृणाल पांड्या, अनुकुल रॉय, प्रिन्स बलंवत राय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तब्बल 4 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सची टीम यावर्षी पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’