हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली महिला आयपीएल जिंकण्याचा भीमपराक्रम मुंबई इंडियन्सच्या संघाने केला आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कपिटल्सच्या संघाचा 7 गडी राखून पराभव करत मुंबईच्या महिला संघाने नवा इतिहास रचला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईने अंतिम सामन्यतः रोमहर्षक विजय मिळवून आपणच चॅम्पिअन आहोत हे सिद्ध केलं. आयपीएलच्या पहिल्याच चषकावर आपलं नाव कोरल्यानंतर मुंबईच्या संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
WPL चॅम्पियन बनल्याबद्दल मुंबईला IPL ट्रॉफी सोबत 6 कोटी रुपयांचा धनादेश मिळाला. त्याच वेळी उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला तीन कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह ट्रॉफीही मिळाली. संपूर्ण स्पर्धेत मुंबईने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला होता. यंदाच्या महिला आयपीएलमध्ये केवळ संघांनाच नव्हे तर वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगीरीसाठीही खेळाडूंना वेगळं बक्षीस देण्यात आलं आहे.
कोणत्या खेळाडूला किती बक्षिस –
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट – हेली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
सामनावीर – नॅट सिव्हर-ब्रंट, मुंबई इंडियन्स (२.५ लाख रुपये)
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) -मेग लॅनिंग, दिल्ली कॅपिटल्स (5 लाख)
पर्पल कॅप (सर्वाधिक बळी)– हेली मॅथ्यूज, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
उदयोन्मुख खेळाडू – यास्तिका भाटिया, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
कॅच ऑफ द सीझन – हरमनप्रीत कौर, मुंबई इंडियन्स (5 लाख रुपये)
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन – सोफी डिव्हाईन, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (5 लाख रुपये)
फेअर प्ले अवॉर्ड – मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (5-5 लाख रुपये)