मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही गुजराती बांधवांची बा तर मराठी बांधवांची आई असल्याचे सांगत मुंबईच्या मेट्रोसाठी अत्यंत तोकडी मदत दिल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३५ किमी मेट्रोसाठी  १ लाख ४१ हजर ४३० कोटी रु मंजूर केले होते. त्या मेट्रोसाठी देखील तोकडी मदत दिली असल्याचे सांगत मेट्रोलाही अडचणीत आणायचे आहे की काय, असा टोमणा त्यांनी मारला. यासोबतच भाजपाच्या कार्यकाळात कोस्टल रोडसाठी मंजूर करण्यात आलेले  १२ हजार ७२१ कोटी रुपये तसेच ७०१ किमी च्या  १२० रुंद समृद्धी महामार्गासाठीचे ५५ हजार ३३५ कोटी ३२ लाख रु याचा उल्लेख करत मुंबई साठी भाजपाचे योगदान त्यांनी सांगितले.

शिवसेनेला टोमणा मारत यावेळी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती ना, त्या शिवसेनेने या दोन्ही रस्त्यांमध्ये आम्हांला मदत  केली असा टोला मारला. दरम्यान अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुबईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment