Mumbai Local : मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दररोज हजारो लोक लोकलने प्रवास करतात. लोकलचा प्रवास आणखी सोयीस्कर व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये एसी लोकल चालवल्या जातात. सुरुवातीला एसी लोकलचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवासी प्रतिसाद देतील की नाही अशी शंका होती मात्र आता AC लोकलला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु AC लोकलच्या वाढत्या संख्येसोबत प्रशासनाची डोकेदुखी देखील वाढली आहे. कारण अनेकदा AC लोकलमध्ये (Mumbai Local) विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळतात. अशा फुकट्या प्रवाशांना आला घालण्यासाठी एक मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
मुंबई लोकल मधून विना तिकीट प्रवास केल्यास 250 रुपयाचा दंड अशा प्रवाशांकडून आकारला जातो. त्यामध्ये प्रवासी तिकिटाचा शुल्क जोडून 255 रुपये प्रवाशाला भरावे लागतात. तर फर्स्ट क्लास मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना 250 रुपये (Mumbai Local) दंड आणि तिकिटाच्या मूळ शुल्कासह 15 रुपये जीएसटी मिळून अधिक रक्कम आकारले जातात. प्रवाशांवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने विविध श्रेणीनुसार दंड आकारण्याची शिफारस केली आहे त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई लोकलमध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि एसी लोकल असे तीन प्रकार आहेत. रेल्वेच्या नव्या प्रस्तावानुसार स्लीपर क्लास साठी 500 रुपये, फर्स्ट क्लास साठी 750 रुपये तर एसी लोकलसाठी १000 रुपयांचा (Mumbai Local) दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एसी लोकल मधून जर तुम्ही फक्त आणि प्रवास करत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला मोठा दंड बसू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार नव्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर नियम लागू केले जातील. प्रस्ताव लागू करण्यासाठी रेल्वे कायद्यात बदल करणे आवश्यक असेल त्यासाठी लोकसभेत मंजुरी घ्यावे लागेल. परंतु हा नियम (Mumbai Local) लागू झाल्यावर मात्र विना तिकीट प्रवास करणं प्रवाशांना चांगलंच महागात पडणार आहे.