Mumbai Local Megablock : मागच्या दोन दिवसात मुंबईत पाऊस असल्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. असे असताना लोकलच्या प्रवाशांकरिता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या रविवारी दिनांक २८ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही जर लोकल ने प्रवास करायचा विचार करत असाल तर रेल्वेने दिलेले वेळापत्रक हे नक्की पहा आणि मगच रेल्वेचा प्रवासाला (Mumbai Local Megablock) निघा.
म्हणून मेगाब्लॉक …(Mumbai Local Megablock)
उपनगरी रेल्वे मार्गावरच्या रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेघा ब्लॉकमुळे काही गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात येतील तर काही गाड्या उशिराने (Mumbai Local Megablock) धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मार्गाबाबत सांगायचं झाल्यास मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत माटुंगा मुलुंड आणि दौंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉगच्या दरम्यान सीएसएमटी इथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वाळवण्यात येतील आणि ठाणे इथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यानंतर अपजलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा (Mumbai Local Megablock) नियोजित वेळेच्या पंधरा मिनिटांनी उशिरा पोहचतील याची नोंद घ्यावी.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर सकाळी 11:05 मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत पनवेल वाशी अप आणि दौंड हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल बेलापूर कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द होतील. पनवेल इथून (Mumbai Local Megablock) ठाण्याकरिता सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील तर सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील ब्लॉक कालावधीमध्ये ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर वरील लोकल सेवा सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे(Mumbai Local Megablock)
तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते पहाटे चार 35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हा रात्र कालीन ब्लॉक आहे. ब्लॉक असलेल्या काळात बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन थीम्या मार्गावर रात्र कालीन मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वाळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द होणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही (Mumbai Local Megablock) मेगा ब्लॉक नसणार आहे. याची लोकलच्या प्रवाशांनी नोंद घ्यावी अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.