सोमवारी मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडणार ? काय आहे कारण ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Train Update : मुंबईकरांना सोमवारी सकाळी ऑफिस गाठणं मोठं आव्हान ठरू शकतं! कारण, मुंबईची ‘लाईफलाइन’ असलेल्या लोकल सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमननी ४ मेपासून ‘नो एक्स्ट्रा वर्क’ आंदोलन जाहीर केल्याने सोमवारी लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोटरमनच्या संघटनांनी वारंवार तक्रारी करूनही रिक्त पदं भरली जात नसल्याने आणि अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याने आता त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. “आम्ही आता नियमांनुसारच काम करू, जादा तास, ड्युटी किंवा एक्स्ट्रा शिफ्ट घेणार नाही,” असं संघटनांचं स्पष्ट (Mumbai Local Train Update) म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कॅबमध्ये कॅमेरे, मानसिक तणाव आणि अविश्वास (Mumbai Local Train Update)

सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेनुसार, मोटरमनच्या कॅबमध्ये कॅमेरे बसवून त्यांच्यावर संशय घेतला जातोय, जो प्रामाणिकपणावर आघात करणारा प्रकार आहे. अनेक मोटरमन सततच्या ताणामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. “आम्ही यंत्र नाही, माणूस आहोत,” असं म्हणत त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

रविवारी परीक्षेमुळे दिलासा (Mumbai Local Train Update)

रविवारी होणाऱ्या NEET 2025 परीक्षेमुळे मध्य रेल्वेने मेगाब्लॉक टाळला आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र सोमवारी मोटरमन आंदोलनाचा थेट फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारचा प्रवास तुलनेत सौम्य असतो, पण सोमवार म्हणजे खऱ्या चाकरमान्यांचा दिवस त्यामुळे गोंधळ होणं अटळ वाटतं.

पश्चिम रेल्वेवरही रात्रीचा ब्लॉक (Mumbai Local Train Update)

दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवार रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत मुंबई सेंट्रल – माहीम दरम्यान जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रवाशांच्या अपेक्षांचं ओझं अधिक वाढलं आहे. तर सोमवारपासून लोकल वेळेवर धावेल का, की प्रवाशांची ‘परिक्षा’ सुरू होणार? मुंबईकरांना सतर्क राहण्याची आणि पर्यायी प्रवास योजना ठरवण्याची गरज आहे.