Mumbai Local : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. केवळ अंतर्गत मुंबईतच नव्हे तर उपनगरीय भागाशी सुद्धा लोकल जोडली गेलेली आहे. दररोज हजारो लोकलने प्रवास करत असतात. उद्या रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी तुम्ही सुद्धा लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा कुठेतरी कामानिमित्त बाहेर जात असाल तर लक्षात ठेवा उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक (Mumbai Local) घेण्यात आलेला आहे. यामुळे लोकल रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रविवारी लोकल रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा
म्हणून घेण्यात येणार ब्लॉक(Mumbai Local)
रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी आणि देखभालीची काम करण्यासाठी रेल्वे कडून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये काही मेल आणि एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. तर काही एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. याचा परिणाम लोकलवर होणार असून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या काळात लोकल रेल्वे चा नक्की वेळापत्रक कसे असेल
मध्य रेल्वे (Mumbai Local)
मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गेगेवर सकाळी आठ ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या ठाणे इथं जलद मार्गावर आणि विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवले जातील. त्यामुळे लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
ट्रान्स हार्बर (Mumbai Local)
अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
वाशी येथून सकाळी 10.25 वा नेरूळयेथून संध्याकाळी 4.09 वाजता ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलच्या दिशेने डाउन ट्रान्स हार्बर सेवा रद्द राहतील.
कर्जत स्थानकावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 13.50 ते 15.35 वाजता म्हणजेच 1 तास 45 मिनिटे ब्लॉकचा कालावधी असणार आहे.या कालावधीत बदलापूर-खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाऊन आणि मधल्या मार्गांवर कामे करण्यात येणार आहेत. दुपारी १२.२० वाजता सीएसएमटी-खोपोली लोकल आणि दुपारी १.१९ वाजता सीएसएमटी- कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवली जाईल.
दुपारी १.४० वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंत धावेल.
दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल आणि दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली-सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून सुटेल. दुपारी ३.२६ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुरू होईल.
पश्चिम रेल्वे मुंबई विभाग (Mumbai Local)
ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. काही अंधेरी आणि बोरिवली ट्रेन गोरेगावपर्यंत चालविण्यात येतील.