Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Local Train) लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कारण, दररोज घड्याळाच्या काट्यावर धावत सुटणाऱ्या मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे लोकल. मुंबईकरांच्या वेळापत्रकाची सगळी भिस्त लोकलवर असते. समजा सकाळी ऑफिसला जाताना पकडायची ट्रेन चुकली तर सगळं गणितचं चुकतं. अनेकदा प्लॅटफॉर्मला ट्रेन लागताना इंडिकेटरवर चुकीची वेळ लिहिलेली असते. तर कधी कधी प्लॅटफॉर्मला लागलेली लोकल वेगळी असते आणि इंडिकेटर वेगळ्याच लोकलची वेळ सांगत असतो. अशावेळी नागरिकांची नुसती भांबेरी उडते.

त्यामुळे बरेच लोक जोपर्यंत ट्रेनची उद्घोषणा होत नाही तोपर्यंत जिना उतरून खाली प्लॅटफॉर्मवर येतच नाहीत. असे गोंधळ पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून पश्चिम रेल्वेने यावर तोडगा काढला आहे. (Mumbai Local Train) मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी कायमच पश्चिम रेल्वे सक्रिय असते. अशातच आता पश्चिम रेल्वेने लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावायचे ठरवले आहे. यामुळे नेमका काय फायदा होणार? आणि हे डिजिटल डिस्प्ले कसे काम करणार? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

एक्स्प्रेस ट्रेनसारखे आता लोकल ट्रेनवर झळकणार डिजिटल डिस्प्ले

पश्चिम रेल्वने घेतलेल्या निर्णयानुसार आता एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे लोकल ट्रेनवरसुद्धा डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर याचा प्रयोग केला जाईल आणि त्यानंतर चाचणी रिपोर्ट घेऊन लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावण्यात येतील. (Mumbai Local Train) यामुळे प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती आहे? आणि किती डब्ब्यांची आहे? हे समजणे सोप्पे जाईल. नुकतेच, मुंबई सेंट्रलच्या पश्चिम रेल्वे ईएमयू कारशेडमध्ये एक नवीन हेड कोड डिस्प्ले देण्यात आल्याचे समजत आहे.

डिजिटल डिस्प्लेमूळे काय फायदा होणार? (Mumbai Local Train)

लोकल ट्रेनवर डिजिटल डिस्प्ले लावल्यामुळे नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल. कारण या डिस्प्लेमूळे प्रवाशांना लोकल ट्रेन कुठे चालली आहे? तसेच समोर प्लॅटफॉर्मला लागलेली ट्रेन ही किती डब्ब्यांची आहे? आणि ती ट्रेन स्लो आहे की फास्ट? अशी सगळी माहिती या डिस्प्लेवर झळकणार आहे. याचे वैशिट्य म्हणजे गार्ड सुरुवातीच्या स्थानकात लोकलचा नंबर टाकण्यात येईल आणि यामुळे प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशांना लोकलच्या प्रवासाविषयी सर्व माहिती डब्यावरील डिस्प्लेवर साजेल.

३ भाषेत देणार माहिती

लोकल ट्रेनवर लावल्या जाणाऱ्या डिजिटील डिस्प्लेच्या माध्यमातून प्रवाशांना एकूण ३ वेगवेगळ्या भाषेत माहिती प्रदान केली जाणार आहे. (Mumbai Local Train) प्रत्येक ३ सेकंदाच्या अंतराने या डिस्प्लेच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लोकलची माहिती दिली जाईल.

HD डिस्प्ले

पश्चिम रेल्वेने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, लोकल ट्रेनवर लावले जाणारे हे डिजीटल डिस्प्ले एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) स्वरुपात असणार आहेत. यावर संरक्षित काच लावण्यात आली असून प्रवाशांना डिस्प्लेवरील अक्षरे देखील ठळक दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे. (Mumbai Local Train) ट्रेनपासून ५ मीटरपर्यंतच्या अंतरावरुन लोकलची माहिती प्रवाशांना दिसेल.