Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र लोकलची गर्दी म्हणजे जोखीम बनली आहे. लोकलची वाढती गर्दी पाहता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र लवकरच लोकलच्या गर्दीवर तोडगा निघण्याची आशा आहे. रेल्वे प्रशासनही मागच्या काही दिवसांपासून लोकांच्या गर्दीचा प्रश्न मिटवण्याच्या (Mumbai Local) प्रयत्न करत आहे.
खरंतर मागच्या काही दिवसांपासून मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल सतत रखडत धावत आहे. काही लोकं उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना कामावर जायला उशीर होतो आहे. शिवाय लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक अपघात मागच्या काही दिवसांमध्ये झालेले आहेत. म्हणूनच लोकलच्या कारभारावर काही प्रवासी लोकलच्या संघटनांनी निषेध नोंदवला (Mumbai Local) होता. एवढेच नाही तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी प्रवासी संघटना काळ्याफिती लावून प्रवास करणार आहेत.
मध्य रेल्वे कडून सर्वेचे काम हाती (Mumbai Local)
कल्याण पासून कर्जत आणि कसारा पर्यंत 15 डब्याची लोकल थांबवता यावी म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढवण्यात यावा अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. यावर रेल्वे कडून सकारात्मकता दर्शवण्यात आली असून प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा सर्वे मध्य रेल्वे कडून करण्यात येणार आहेत प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यास कर्जत कसारा हून भरून येणाऱ्या लोकलमधील गर्दी कमी (Mumbai Local) होण्यास मदत होणार आहे.
लोकल मधील वाढती गर्दी आणि लोकल पकडताना होणारे अपघात ही गोष्ट लक्षात घेऊन लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याबरोबरच लोकलच्या मार्गावरून मेल एक्सप्रेस ऐवजी फक्त (Mumbai Local) लोकल सोडण्यात याव्यात अशी ही मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवावी याची चाचणी करण्यात येत आहे.
काय आहेत मागण्या? (Mumbai Local)
- टिटवाळा आणि बदलापूरहून 15 डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात.
- कळवा व मुंब्रा स्थानकात सकाळ-संध्याकाळ काही जलद लोकांना थांबा मिळावा.
- लोकलच्या मार्गावरून मेल एक्सप्रेस ऐवजी लोकलच सोडण्यात याव्यात
- प्लॅटफॉर्मची रुंदी वाढावी.
प्रवासी संघटनांचे आंदोलन (Mumbai Local)
लोकल प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे स्थानकातून लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास प्रवाशांना करावा लागतो. परिणाम म्हणून प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात म्हणूनच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रवासी संघटनांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी काळ्या फिती (Mumbai Local) लावून प्रवास करत आंदोलनाचा इशारा दिला होता.