लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात चोरी हा प्रकार बंद पडला. त्यामुळं चोरीचा धंदा या लॉकडाउननं मंदा केला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत एकूण 484 चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या, परंतु यावर्षी मार्च महिन्यात ही प्रकरणे जवळजवळ शून्य आहेत. तज्ञांच्या मते, याची दोन कारणे आहेत. चोरण्यासाठी गर्दीची जागा लागते, गर्दीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स, बॅग सारखी चोरी करणं सोपं असतं. परंतु लाॅकडाऊनमुळे गर्दी नाही ज्यामुळे चोरी करणं शक्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर घरफोडीची प्रकरणं अधिक असतात पण लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरात आहेत आणि अशा परिस्थितीत चोरांना चोरी करणे शक्य होत नाही. मार्च महिन्याआधी स्ट्रीट क्राईम म्हणजे चैन स्नॅचिंग, रस्त्यावरील भांडणे, खून, चोरी, अपघात इत्यादी अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. पण आता लोक रस्त्यावरच येत नसल्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीत मोठी घट आहे.

परिणामी, कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्यात मुंबईत एकूण 1100 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 3368 एफआयआर नोंदविण्यात आल्या होत्या. या 1100 प्रकरणांमध्ये बहुतांश घटनांमध्ये कलम 188 चे उल्लंघन करण्याची प्रकरणं आहेत म्हणजे लाॅकडाऊनचं उल्लंघन. 2019 मध्ये एकूण 41933 गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील बहुतांश चोरीचे होते.

लाॅकडाऊनच उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस सध्या कठोर कारवाई करत आहेत. त्यामुळे घटलेल्या क्राईम रेटमुळे पोलिसांना देखील कोरोना लॉकडाऊनची मोठी मदत मिळत आहे, तर छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अटक देखील पुढे ढकलत आहेत. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रकरणांव्यतिरिक्त लोकांच्या जामिनाला विरोध ही करत नसल्याचं चित्र आहे. तर एकूणच काय तर लॉकडाउनचा आर्थिक फटका चोर राजाला सुद्धा बसला असून कोरोनाने त्याला घरातच कैद केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

Leave a Comment