हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted due to chest pain in a hospital in the city, says BMC Mayor's Office
(File pic) pic.twitter.com/R5deDUThr1
— ANI (@ANI) July 18, 2021
किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला महापौरांच्या कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र,त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.