Thursday, March 23, 2023

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन होवून घेणार उपचार

- Advertisement -

मुंबई । मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. लक्षणे नसल्यानं घरीच क्वारंटाईन होवून डॉक्टरांच्या सल्यानं उपचार घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

“मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

- Advertisement -

कोरोना पॉजिटिव्ह आल्यामुळं घरातील सर्वांचे तसंच बंगल्यावरील सर्व कर्मचा-यांचे स्वॅब घेण्यात आले असून शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट येतील. महापौरांची अँटिजेन टेस्ट पॉजिटिव्ह आली असली तरी खात्रीसाठी आरटीपीसीआर चाचणीकरता त्यांचा स्वॅबही घेतला गेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.