मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 2025-26 च्या बजेटमध्ये मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठी चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ₹40,187 कोटींच्या बजेटपैकी तब्बल87% रक्कम म्हणजे ₹35,151 कोटी मेट्रो विस्तार, बोगदे आणि कोस्टल रोडसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) मेट्रो नेटवर्कचा मोठा विस्तार होणार आहे.
विरारपर्यंत मेट्रोसाठी हिरवा कंदील
MMRDA ने मीरा रोड (शिवाजी चौक) ते विरार मेट्रो मार्ग (लाईन १३) तयार करण्याची घोषणा केली आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे रोज लोकलने विरारपर्यंत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच, कांजूरमार्ग ते बदलापूर (मेट्रो १४), कल्याण ते उल्हासनगर (मेट्रो ५), आणि गायमुख ते मीरा रोड (मेट्रो १०) यांसारख्या मेट्रो मार्गांना देखील गती देण्यात येणार आहे.
यंदा कोणते प्रकल्प सुरू होणार?
मेट्रो ९:दहिसर ते काशी गाव मेट्रो या वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 2B: मानखुर्द ते चेंबूर नाका या मार्गाचा काही भाग यंदा प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो.
ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो ५) आणि स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग (मेट्रो ६) यांसाठी निधी मंजूर.
घोडबंदर रोडवरील वाहतूक होणार वेगवान
मीरा रोड ते ठाणे प्रवास जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी घोडबंदर रोडवर मोठे काम होणार आहे.
गायमुख ते फाउंटन हॉटेल अंडरपास: ₹1,200 कोटी
फाउंटन हॉटेल ते भाईंदर फ्लायओव्हर: ₹1,000 कोटी
जैसल पार्क (भाईंदर) ते घोडबंदर नवीन रस्ता
साई पॅलेस (घोडबंदर) ते ठाकूर मॉल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे – 30 मीटर रुंद रस्ता
महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांसाठी निधी वाटप
डी.एन. नगर ते मंडाळे: ₹2,155 कोटी
वडाळा ते कासारवडवली: ₹3,247 कोटी
ठाणे-भिवंडी-कल्याण: ₹1,579 कोटी
स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग: ₹1,303 कोटी
दहिसर-भाईंदर आणि अंधेरी-एअरपोर्ट: ₹1,182 कोटी
कल्याण-तलोजा: ₹1,500 कोटी
पायाभूत सुविधांसाठी कर्ज आणि जमिनीच्या विक्रीवर भर
₹22,327 कोटी निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे.
₹7,344 कोटी महसूल हा जमिनीच्या विक्रीतून मिळवला जाणार आहे.
विद्यमान प्रकल्पांच्या देखभालीसाठी ₹619 कोटी खर्च करण्यात येणार आहेत