मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील अंधेरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना अंधेरी मेट्रो स्टेशन खालील सिद्धेश्वर महिला संघाच्या शौचालयात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यामध्ये एक तरुण आणि तरुणी एकत्र शौचालयात गेले होते. पण काही वेळाने तरुण एकटा बाहेर आला. तरुणी काही बाहेर आली नाही. म्हणून संबंधित पाहण्यास गेले तेव्हा त्यांना या महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी शौचालयकडं येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यामध्ये मृत महिला एका तरुणासोबत शौचालय मध्ये जाताना दिसली आहे. पण आरोपीचा काही शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तरुणीच्या मोबाईलनंबर वरून तांत्रिक तपास करत हत्या करणाऱ्या आरोपी नियाज अन्सारी याला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण
नियाजचे या 19 वर्षीय तरुणीसोबत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. यानंतर नियाज वारंवार लग्नासाठी तरुणीकडे मागणी करत होता. पण तरुणी लग्नाला टाळाटाळ करत होती. तसेच नियाजबरोबर राहायलादेखील ती तरुणी टाळाटाळ करत होती. यावरून नियाज आणि ती तरुणी यांच्यामध्ये अनेक वेळा भांडण देखील झाले होते. यामुळे नियाजने आपल्या प्रेयसीला मारण्याचा प्लॅन केला. त्याने काही कामानिमित्त प्रेयसीला अंधेरीला आणले. त्यानंतर त्या दोघांमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. यानंतर दोघे अंधेरी मेट्रो रेल्वेस्थानका खालील सिद्धेश्वर महिला संघ संचलित शौचालयात गेले.
यानंतर नियाजने नियोजनानुसार आपल्या प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हि हत्या केल्यानंतर नियाज अंधेरी रेल्वे स्थानकावर पळत गेला आणि विरारच्या दिशेने जाणारी लोकल पकडून फरार झाला. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करत नियाजला अटक केली आहे. पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.