Mumbai Nashik Highway : महत्वाची बातमी ! कसारा घाट 6 दिवस राहणार बंद ; काय आहे पर्यायी मार्ग ? जाणून घ्या

0
1
kasara ghat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Nashik Highway : तुम्ही जर मुंबई- नाशिक महामार्गावर प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ता पुढचे सहा दिवस बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव घाट रस्ता पुढचे सहा दिवस बंद असणार आहे. या रस्त्यावर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून सोमवार ते गुरुवार दरम्यान तसेच 3 ते 6 मार्च या कालावधीत या घाटातील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर बंद दरम्यान (Mumbai Nashik Highway) प्रवास करू नका.

म्हणून मार्ग राहणार बंद (Mumbai Nashik Highway)

राज्यातील विविध मार्गांवर पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. जुना कसारा घाटात देखील रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून दिलेल्या कालावधीमध्ये मुंबई कडून नाशिक कडे जाणारी वाहने नवीन कसारा घाटा मार्गे जातील. संध्याकाळनंतर सकाळी आठ वाजेपर्यंत ही वाहतूक जुन्या कसारा घाटातील नेहमीच्या मार्गाने होईल या कालावधीत घाटातील अवजड वाहनांची वाहतूक ही पूर्णतः बंद राहणार आहे. वाहतूक निर्बंधाची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक कार्यालयाने काढली आहे.

वाहतुकीतील बदल (Mumbai Nashik Highway)

दरम्यान दुरुस्तीच्या काळामध्ये कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नाशिक मुंबई दरम्यानच्या वाहतुकीत बदल करून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीमध्ये जुन्या घाटातील दोन्ही मार्गावर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. जुन्या कसारा घाटात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत वाहतूक बंद राहील. या काळात नाशिक कडे जाणारी सर्व वाहने नवीन कसारा घाटातून मार्गक्रमण करतील. चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून एकेरी मार्गाने वाहनांना मार्गस्थ होता येईल. संध्याकाळी सहा नंतर जुना कसारा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे.

दरम्यान दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई या कसारा घाटातील दोन्ही मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरून यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून इच्छित स्थळी जाता येणार आहे. वाहतुकीचे हे निर्बंध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहणार आहे.

मदत केंद्रांची उभारणी (Mumbai Nashik Highway)

दरम्यान रस्त्यातील बदल लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस महामार्ग पोलीस, घोटी केंद्र महामार्ग पोलीस, शहापूर केंद्र आपत्ती व्यवस्थापन टीमही नवीन कसारा घाटात (Mumbai Nashik Highway) कार्यरत राहणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची मदत केंद्र ही उभं राहणार असल्याचा प्रशासनाने सांगितले आहे.