मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील खड्डयांविरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने आजपासून “मुंबई बन गई खड्डे का अड्डा” आंदोलन छेडले असून रस्त्यांवरील खड्डयांचे फोटो महापालिकेला टॅग करण्याचे आवाहन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केले आहे.
ही मोहीम जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाहीत तोपर्यंत सुरूच राहणार आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन सुरू करत आहोत, यामुळे खड्ड्यांचे सोशल ऑडिट पण होईल, जर कारवाई झाली नाही तर वॉर्ड नुसार आंदोलन करू, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
जनतेनेही या मोहिमेत सहभागी व्हावे आणि #KhaddeKaAdda #MumbaiPotholes या हॅशटॅग खाली खड्ड्यांचे फोटो टाकून महापालिकेला टॅग करावे असे आवाहन मलिक यांनी केले.