Sunday, May 28, 2023

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संक्रमित रुग्णाचा बेड वापरात आल्यानं एका ३ दिवसाच्या नवजात बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील चेंबूर भागातील साई हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर राज्यातील सर्वात लहान कोरोनाबाधित रुग्ण म्हणून या बाळाची नोंद झाली आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेबाबत वृत्त दिल आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, २६ मार्च रोजी चेंबूर मधील साई हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला. बाळाला आणि आईला कोरोनाची लागण झाल्यावर सुरुवातीला दोघांना कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात आणि नंतर कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. कोरोना प्रकरणांचे नोडल केंद्र असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात आई आणि बाळाला दाखल केल्यापासून येथील बालरोग तज्ज्ञांनी बाळाची तपासणी केली नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

व्यवसायानं रेस्टॉरंट मॅनेजर असलेल्या बाळाच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ”कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी साई हॉस्पिटलमध्ये आपल्या पत्नीसाठी एक वेगळी रम बुक केली होती. २६ मार्चला माझ्या पत्नीच्या प्रसूतीच्या २ तासांनंतर साई हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी आम्हाला अचानक रूम रिकामी करण्यास सांगितले आणि आम्हाला दुसर्‍या बेडवर हलवले. पण त्यांनी असं का केलं याबाबत त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्याच्या दुसर्‍याच दिवशी एका डॉक्टरांनी मला फोन करून आम्हाला तुमची कोरोना विषाणूची तपासणी करण्यास सांगितले.” याचबरोबर आपल्या पत्नीचे सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी फारच कमी डॉक्टर उपलब्ध असल्याने आपण प्रसूतीसाठी जास्तीचे बिल दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

२७ मार्च रोजी कोरोना चाचणीसाठी आई आणि बाळाचे स्वब एका खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर साई हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आम्हाला लॅबच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान, ज्याची भीती वाटत होती तेच झालं. आई आणि नवजात बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आम्हाला धक्का बसल्याचं बाळाच्या वडिलांनी सांगितलं. जेव्हा आई आणि बाळाला कोरोना झाल्याची बाब समजताच २७ मार्चपासून साई रुग्णालयातील कोणत्याही नर्स किंवा डॉक्टरने माझ्या पत्नीची किंवा बाळाची तपासणी केली नाही. त्यांनी आम्हाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले. त्यानंतर ३१ मार्च रोजी हॉस्पिटल बंद करण्यात आलं. हॉस्पिटलच्या वार्ड अधिकारी पृथ्वीराज चौहान यांना विचारणा केली असता संपूर्ण हॉस्पिटलचे निर्जंतुकीकरण करावे लागत असल्यानं ते बंद करत असल्याचं त्यांनी सांगितलं. वारंवार प्रयत्न करूनही साई रुग्णालयाच्या अधिका्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही.”

त्यानंतर नाईलाजानं आई आणि बाळाला प्रथम कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत दोघांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. पण आपली परीक्षा इथेच संपली नसल्याच बाळाच्या वडिलांनी सांगितलं. कस्तुरबा रुग्णालयामध्ये बाळाला दाखल केल्यापासून कोणत्याही बालरोग तज्ञांनी बाळाला भेट दिली नाही, असा आरोप बाळाच्या वडिलांनी केला आहे. ते म्हणाले, “हे आमचं पाहिलंच बाळ असून मला आता त्याच्या तब्बेतीबाबत चिंता वाटत आहे.”

हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता, आई आणि बाळावर फक्त लक्षणात्मक उपचार केले गेले असल्याचे त्याने सांगितले. कस्तुरबा रुग्णालयात सध्या १२० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारात बालरोग तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी सांगितले की, बाळाला जन्म देण्यापूर्वीच आईला आणि बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब नाकारता येत नाही. परंतु लॉकडाऊनमुळे १० दिवसांपर्यंत घरीच असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आणि आईला कोणतीही लक्षणे दिसली नसल्याचं त्यांनी सांगितलं. “कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरलेला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड रिकामा झाल्यानंतर बेडचे निर्जंतुकीकरण करणे हा एक वैद्यकीयप्रोटोकॉल आहे. टर्मिनल क्लीनिंग नावाचा हा प्रोटोकॉल फक्त कोरोना व्हायरससाठीच नाही तर याचे नेहमीच पालन केला पाहिजे,” असं डॉ. तनु सिंघल म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता