Mumbai News : आपल्या देशावर ब्रिटिशांनी जेव्हा राज्य केले त्या काळात अनेक बांधकामे केली गेलीत . मोठमोठ्या वास्तूशिवाय रेल्वे मार्ग आणि पूल यांचाही यामध्ये समावेश आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागांमध्ये या ब्रिटिशकालीन पुलांचा आणि वास्तूंचा वापर केला जातो. मुंबईतही असा एक ब्रीटीशकालीन पूल आहे ज्याचा वापर अद्यापही होत असून मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत याचे मोठे योगदान आहे. हा पूल दक्षिण मुंबईतला (Mumbai News) असून याचे नाव बेलासिस पूल आहे. हा पूल १३० वर्षे जुना आहे. आता हा पूल नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास १८ महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
जुने बांधकाम पाडून नवा पूल बांधण्याचे काम रेल्वे आणि मुंबई (Mumbai News) महानगरपालिका प्रशासनानं हाती घेतले आहे. पुनर्बांधणीसाठी या पुलावरील वाहतूक १८ महिने बंद ठेवण्यात येणार असून त्यामुळे येथून ये- जा करणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय असेल पर्यायी मार्ग ? (Mumbai News)
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या निर्णयानंतर हा पूल काही काळासाठी बंद (Mumbai News) करण्यात येणार आहे. ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल अशा महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या पुलावरील वाहतूक बंद असतेवेळे वाहनधारकांना मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव जंक्शन मार्गे वाहतूक करण्याचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.
पठ्ठे बापूराव मार्गावर ताडदेव सर्कल ते नवजीवन जंक्शनपर्यंत नो पार्किंग असेल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, पर्यायी मार्गांवर काही ठराविक वेळांमध्ये वाहतूक कोंडी नाकारता येत नाही, ज्यामुळं या नव्या मार्गांचा विचार करूनच मुंबईकरांनी (Mumbai News) दिवसभराच्या प्रवासाची आखणी करावी.