Mumbai News : कल्याण – डोंबिवलीकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai News : कल्याण – डोंबिवली (Mumbai News) मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

कल्याण डोंबिवली ठाणे या मार्गावरील प्रवास वाहतूक कोंडी शिवाय आणि सुकर करण्यासाठी एम एम आर डी ए अर्थात मुंबई (Mumbai News) महानगर प्रदेश प्राधिकरणाने ठाणे पडघा उन्नत असा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एम एम आर डी ए चे निर्णयानुसार रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार केला जातो आहे यासाठी सल्लागार नियुक्ती अंतर्गत निवेदादेखील मागवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या निमित्ताने ठाणे नाशिक प्रवास सुद्धा सुकर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे ते पडघा हा 30 किलोमीटर अंतराचा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय एम एम आर डी ए ने (Mumbai News) घेतल्यामुळे ही समस्या सुटणार आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर प्रवास करण्यासाठी वाहनधारकांकडून टोल आकारण्यात येणार आहे. पुढे हाच रस्ता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणार असल्यामुळे मुंबईतून बाहेर पडण्यासाठीचा आणखी एक मोठा मार्ग प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे.

ठाणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हा अतिशय महत्त्वाचा आणि गर्दीचा रस्ता आहे. येणाऱ्या भिवंडी शहापूर भागात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोदाम कारखाने तयार झाले आहेत. या वाटेवर दररोजच वाहतूक कोंडी (Mumbai News) झाल्याचे पाहायला मिळते. तर या भागातून भिवंडी कल्याण डोंबिवली या ठिकाणावर पोहोचण्यासाठी प्रवास करणाऱ्यांनाही वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. मात्र या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे.