Mumbai News : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता झपाट्यांने नवनवीन प्रकल्प विकसित होताना पाहायला मिळत आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, याशिवाय मेट्रो बुलेट ट्रेन यासारखे काही येऊ घातलेले प्रकल्प देखील आहेत.अनेक विविध प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहे. आता मुंबईमध्ये पर्यटनाचा आनंद आणखी वाढविण्यात यावा याच उद्देशाने मुंबईमध्ये (Mumbai News) जागतिक पातळीच्या प्रमुख शहरांमधील मरीनाच्या धरतीवर मुंबईमध्ये समुद्रकिनारी मरीना प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट इथं हा प्रकल्प उभारण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पाचा अहवाल तयार केला जाणार आहे.
एमएमआरडीए चे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये विधानभवनात एक बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये या प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आलं.
कुठे उभारण्यात येणार प्रकल्प ? (Mumbai News)
एमएमआरडीए कडून उभारण्यात येणाऱ्या नरिमन पॉईंट ते कफपरेड कनेक्टरला लागूनच हा प्रकल्प साकारला जाणार आहे. नरिमन पॉईंट येथील एनसीपीए थेटर नजीक समुद्रामध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्तावित आहे.
मारीना म्हणजे काय? (Mumbai News)
आता तुमच्यापैकीच बहुतांशजणांना हा प्रश्न पडला असेल की मरीना म्हणजे नक्की काय ? तर मरीना म्हणजे छोट्या बोटी जॉर्ड क्राफ्ट पार्किंगसाठी जागा असते आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता याशिवाय इथे रेस्टॉरंट आणि मनोरंजनाच्या इतर सुविधा सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. परदेशात असे प्रकल्प तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील.
सिंगापूरमधील कंपनीकडून पाहणी
याआधी मुंबईतील जल पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai News) पोर्ट ट्रस्ट कडून पूर्व किनारपट्टीवर मरीना प्रकल्प उभारण्यात येत होता. प्रिन्सेस डॉक परिसरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी अपेक्षित प्रतिसाद कंत्राटदारांकडून मिळाला नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. आता त्याच धर्तीवर पश्चिम किनारपट्टीवर ही हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन केलं आहे. सिंगापूर स्थित कंपनीकडून या प्रकल्पाच्या सुसाध्यतेबाबत प्राथमिक पाहणी करण्याचे प्रस्तावित आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की यापूर्वी नरिमन पॉईंट ते कफपरेड दरम्यान पुलाची उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यातून मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार होता त्यामुळे मच्छीमारांना अडचण येऊ नये यासाठी या मार्गात बदल केला असून आता किनाऱ्यालगत रस्ता उभारला जाणार आहे. या रस्त्याला लागून मरीना उभारण्याचा विचार आहे. या मरीनामध्ये मनोरंजनाच्या गोष्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल तसेच मुंबई (Mumbai News) पर्यटनाच्या संदेश निर्माण होतील एमएमआरडीएकडून याचा आराखडा बनवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.