Wednesday, March 29, 2023

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र | शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.

मुंबईत २४ तास मॉल, रेस्तराँ, आणि पब खुले राहिले तर त्यामुळं मद्यसंस्कृती वाढेल आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील. त्यामुळं अशी संस्कृती भारतासाठी चांगली ठरेल का याचा त्यांनी विचार करायला हवा, असं पुरोहित म्हणाले. मुंबईतील नाइट लाइफ तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यामुळं बलात्काराच्या घटना वाढतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्यात आवश्यक मनुष्यबळ नाही, असंही पुरोहित म्हणाले.

- Advertisement -

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

चले जाओ, हा हिंदूस्तान आहे पाकिस्तान-बांगलादेश नाही; मनसेची पुण्यात पोस्टरबाजी

धक्कादायक! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ आरोपींना अटक

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले

गोत्यात‘उबर इट्स’ला ‘झोमॅटो’नं घेतलं विकत; तब्बल २४८५ कोटी रुपयांना झाला व्यवहार