Wednesday, October 5, 2022

Buy now

हनी ट्रॅप प्रकरण : मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीस अटक, बड्या उद्योगपतींना घातला कोट्यवधीचा गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा प्रकरणातील आरोपीना अटक करण्याचे मुंबई पोलिसांपुढे वआव्हान आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात नुकतीच एक मोठी कारवाई केली असून हनी ट्रॅप लावून बढया उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईत एका महिला फॅशन डिझायनरचा समावेश असून ती नव्वदच्या दशकातील एका बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे.

याबाबत अधिक माहहती अशी की, मुंबईत पोलिसांकडून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली. त्या कारवाईत बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी, अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर लुबना वजीर उर्फ सपनाच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तिच्याकडे 29 लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली. तर 7 मोबाईल फोन, 2 कार आणि 8 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने सापडले. दरम्यान सपना उर्फ लुबना वजीर हिच्यासह दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल फरार आहे.

लुबना वजीर हिच्याकडून मुंबईतील जुहू, वांद्रे, लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या आणि अनेक कार्यक्रम केल्या जात होत्या. या पार्ट्यांच्या माध्यमातून ती अनोळखी लोकांशी जवळीक साधत असे. तसेच त्याच्या माध्यमातून ती मैत्री करुन सावजाचा शोध घेतला जात असे. नंतर त्यांना हनी ट्रॅप प्रकरणात अडकवून पैसे लुटत असे. तिने आतापर्यंत शेकडो जणांना गंडा घेतला आहे.