दाऊदचा साथीदार दानिश चिकना याला अखेर अटक; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

वृत्तसंस्था : मुंबई येथील डोंगरी परिसरात ड्रग्सची फॅक्टरी चालवणाऱ्या आणि कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक मानल्या जाणाऱ्या दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दानिशला बेड्या ठोकल्यात. याबाबतची माहिती ए एन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्याच्याविरोधात एनसीबी कडे 2 तर डोंगरी पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल असून तो त्यात वॉन्टेड आहे.

अशी मिळाली माहिती
एनसीपी ने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील छापेमारी च्या दरम्यान दाऊदचा साथीदार चिंकू पठाण ला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्या दरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले. मुंबई एन सी बी चे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा दानिश ला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक ड्रग्स फॅक्टरीत पोहोचले तेव्हा तो भिंतीवरून उडी मारून पळून गेला.

पोलिसांना चकवा, नाट्यमय रित्या अटक
दानिश पळून गेल्यानंतर एन सी बी चे पथक सतत त्याच्या मागावर होते. त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते राजस्थानमध्ये सापडत होते. जेव्हां एनसीपीने दानिश ला अजमेर मधले घेराव घातला, तेव्हा तिथूनही तो चकवा देऊन पळून गेला. पण नंतर कोटा मध्ये दानिश चे ठिकाण सापडल्यावर कोटा पोलिसांना कळवण्यात आलं आणि दानिश ला अटक करण्यात आली.

You might also like