मुंबई । नालासोपारामधील तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे.
म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच त्यांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली आहे. पोलीस हवालदार सखाराम भोये (42) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Maharashtra: Head constable of the Vasai-Varar Police Commissionerate in the Palghar district, died by suicide. He shot himself in the Tulinj police station today in the morning. The body has been sent to a hospital for conducting post-mortem procedures.
— ANI (@ANI) December 24, 2020
गेल्या 4 वर्षापासून पालघर जिह्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात ते हवालदार म्हणून कार्यरत होते. या आत्महत्येने पोलीस गटात शोकाकुल वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’