पोलिस दलातील पतीकडून पत्नीचा पैशासाठी छळ, साताऱ्यात चाैघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलात असलेल्या पतीसह चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपयेच्या मागणी करत सासरचे चारजण त्रास देत असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणात राजू शिवाजी जाधव (मुंबई पोलीस, नेमणूक घाटकोपर), कांताबाई शिवाजी जाधव, शिवाजी रामचंद्र जाधव सर्व (रा. सिद्धनाथवाडी, वाई) सुरेश शिवाजी जाधव (रा. धनकवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयितांनी मुंबईत घराला डिपॉझिटसाठी ५० हजार रुपये तसेच वाई येथे जागा घेण्यासाठी ५ लाख रुपये माहेरहून आण, अशी मागणी विवाहिता विद्या राजू जाधव यांना केली. या कारणासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारिरीक आणि मानसिक जाचहाट केला. तसेच तिला कोणत्याही कारणावरून मारहाण केली जात असे. वारंवार होणाच्या जाचहाटाला कंटाळून विवाहितेने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Comment