मोठी बातमी!! मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह पक्षातच बंडखोरी केली. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना आहे अस म्हणत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाला आहे. शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली असून मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

10 जुलै पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यात आल्याचे समजत आहे. तसेच आमदार खासदारांच्या कार्यालयाबाहेर देखील पोलिसांची सुरक्षा आहे. आमदारांच्या बंदमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

आज सकाळीच बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. इथून पुढे संपूर्णमहाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन करत गद्दाराना अद्दल घडवली जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. तानाजी सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

Leave a Comment