ताज हॉटेल उडवून देण्याची पाकिस्तानमधून धमकी; मुंबई पोलीस हायअलर्टवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईतील ताज हॉटेल पुन्हा एकदा दशवाद्यांच्या रडारवर आलं आहे. कारण ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यासोबतच तपासही सुरु केला आहे. फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत

मुंबई पोलिसांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेल बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर ताज हॉटेल आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच ताज हॉटेल समुद्राला लागून असल्याने समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून लक्ष ठेवलं जात आहे.

२००८ साली २६/११ हल्ल्यात दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले होते. यामुळे ताज हॉटेलबाहेर नेहमीच पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. ताज हॉटेल मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असून इथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. पण लॉकडाउनमुळे सध्या येथील परिसरात शांतता आहे. मात्र, ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस हायअलर्टवर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment