Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा महामार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असला तर त्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या.. कारण आज २५ एप्रिल रोजी मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर २ तासांचा ब्लॉक असणार आहे.

12:00 ते 2:00 वेळेत वाहतूक ठप्प – Mumbai-Pune Expressway

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे देखरेख केलेल्या महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून पुणे ते मुंबई वाहिनीवर 19.100 किलोमीटर अंतरावर गॅन्ट्री बसवली जाईल. हे काम आज दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असेल. प्रवाशांनी वेळ पाहूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावं. गॅन्ट्री उभारण्याच्या प्रक्रियेदरम्यान, मुंबई वाहिनीवरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद असेल मात्र, सुरळीत प्रवास व्हावा यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी, डायव्हर्जन पॉइंट मुंबई वाहिनीवर 55 लेन किलोमीटरवर असेल. ही वाहने मुंबईपुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48, खोपोली शहरातून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करून मुंबई वाहिनीमार्गे शेडुंग टोलनाक्यावरून पुढे जातील. एक्सप्रेसवे वरील आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकास करण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय कमी करणे हा या डायव्हर्जनचा उद्देश आहे. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुधारण्यासाठी, गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) तात्पुरता वाहतूक ब्लॉक आवश्यक आहे.