Mumbai Pune Expressway : राज्यातील महत्वाच्या महामार्गांपैकी मुंबई – पुणे एक्सप्रेसवे अतिशय महत्वाचा मार्ग मनाला जातो. दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग व्यापार , उद्योग आणि कर्मचारी वर्गासाठीच सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी अनेकदा या मार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी (Mumbai Pune Expressway) शासनाकडून सुद्धा मोठे प्रयत्न केले जात आहेत.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातील (एनएचआय) अधिकाऱ्यांकडून एका मराठी माध्यमाला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच अटल सेतू आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. यामुळे केवळ कनेक्टिव्हिटी वाढणार नसून मुंबई ते पुणे हे अंतर कमी वेळेत कापले जाणार आहे.
मुंबई – पुणे प्रवासात दीड तासांची बचत (Mumbai Pune Expressway)
या नव्या महामार्गासाठी तब्बल 17000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नव्या महामार्गामुळे अटल सेतूवरून थेट सोलापूर आणि सातारासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी सुद्धा आणखी कमी होणार आहे त्यामुळे नव्या महामार्गामुळे मुंबई ते पुणे साठी लागणाऱ्या सध्याच्या वेळेत सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे त्यामुळे आगामी काळात हा शिग्रसंचार द्रुतगती महामार्ग गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.
कसा असेल नवा मार्ग ? (Mumbai Pune Expressway)
- प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे सातारा, सोलापूरला सोडलं जाईल.
- तब्बल 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग चौक पुणे शिवारे जंक्शन असा असेल.
- या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण 8 लेन असतील.
- या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल 17500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाची रूपरेषा तयार केली जात आहे.
कोंडी फोडण्यासाठी तयार होतोय मिसिंग लेन
मुंबई पुणे महामार्गावरील कोंडी सोडण्यासाठी लोणावळा परिसरात मिसिंग लेन तयार केली जात आहे. मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी कमी करणाऱ्या या मिसिंग लेनचे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून भविष्यातही सुविधाही अपुरी पडण्याची शक्यता (Mumbai Pune Expressway) आहे. म्हणूनच अटल सेतू शिघ्नसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.