Mumbai-Pune Expressway : अडखळत नाही आता मुंबई – पुणे प्रवास होणार सुस्साट ! खुला होतोय नवा पूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे राज्यात महत्वाची आहेत. त्यातही दररोज पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. या दोन्ही महत्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई -पुणे महामार्ग. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या मार्गावर प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता असे होणार नाही मुंबई – पुणे (Mumbai-Pune Expressway) प्रवास सुसाट होणार आहे.

ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेला येणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका खोली करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे.अशी माहिती एका मराठी माध्यमाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा थेट या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

एक वाहतुकीचा आणखी एक पर्याय (Mumbai-Pune Expressway)

ठाणे खाडी पूल प्रकल्पातील ही मार्गिका खुली झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडी पूल दोन याबरोबरच नवीन ठाणे खाडी पूल तीन चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबई पुणे प्रवास हा कोंडीमुक्त मुक्त आणि सुसाट होणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही मार्गीका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल 3 च्या रूपाने आणखी एक वाहतुकीचा पर्याय नागरिकांना (Mumbai-Pune Expressway) खुला होणार आहे.

पुणे -मुंबई मार्गिकेसाठी अद्याप प्रतीक्षाच

सध्याचा विचार करता मुंबई पुणे इथून प्रवास करायचा असेल तर दोन खाडी पूल सेवेत आहेत. मात्र वाहतूक कोंडी कमी करण्याच्या हेतून एमएसआरडीसीने ठाणे खाडीपूल ३ हा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे म्हणजेच मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुणे-मुंबईचा प्रवासा वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावे लागणार आहे. कारण उत्तरेकडील मार्गिकेचे म्हणजेच पुणे- मुंबई मार्गिकेचे काम अद्याप 75 टक्के पर्यंतच पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2024 च्या अखेरीस हे काम सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये ही मार्गिका देखील वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. पुणे मुंबई व्हाया ठाणे खाडीपूल ३ असा प्रवास (Mumbai-Pune Expressway) करण्यासाठी जानेवारी 25 ची वाट पाहावी लागणार आहे.

काय आहे प्रकल्प? (Mumbai-Pune Expressway)

ठाणे आणि भिवंडी दरम्यान असलेल्या खाडीवर या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून या खाडीवर तीन पूल बांधण्यात येत आहेत. ठाणे ते भिवंडी दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या तीन पुलांचं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच या पुलांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.