Mumbai-Pune Expressway : आज दिनांक 3 एप्रिल आणि 4 एप्रिल, 2024 रोजी तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे . या दोन दिवसात दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मर्गावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळ पहा आणि मग बाहेर पडा नाहीतर तुम्हाला (Mumbai-Pune Expressway) ट्राफिकचा सामना करावा लागू शकतो.
आज आणि उद्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 93/900 किलोमीटरच्या चिन्हावर गॅन्ट्री बसवण्याचे नियोजन आखले आहे, पुणे आणि मुंबई लेनवर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीद्वारे हे काम केले जाणार आहे. गॅन्ट्रीची च्या कामासाठी , द्रुतगती मार्गावर हलक्या आणि जड वाहनांसह दोन्ही दिशांना होणारी वाहतूक (Mumbai-Pune Expressway) थांबविली जाणार आहे
पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना (Mumbai-Pune Expressway)
या कालावधीत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. पुण्याहून मुंबईकडे हलक्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई कालवा आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 48, पारंपारिक जुना पुणे-मुंबई मार्ग.निवडण्यास सांगितले आहे.
.
सर्व प्रकारची वाहने किवळे पुलावरून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने कुसगाव टोलनाक्याकडे 55.000 किलोमीटर अंतरावर (लोणावळा एक्झिट) जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून (Mumbai-Pune Expressway) पुण्याकडे वळवली जातील.
तसे पाहायला गेले तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा नेहमी वर्दळीचा महामार्ग आहे. शिवाय नोकरी आणि काम धंद्याच्या निमित्ताने या रस्त्यावरून रोजच ये-जा करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे हा महामार्ग सतत वर्दळीचा असतो. शिवाय विकेंड ला देखील या मार्गावर खूप गर्दी असते. त्यामुळे तुम्ही जर आज आणि उद्या या मार्गावरून प्रवास करणार असाल तर मात्र (Mumbai-Pune Expressway) माहिती घेऊनच बाहेर पडा.