हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) वाहतूक कोंडीची समस्या जाणवत होते. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळेच यावर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक तोडगा काढला आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर राज्यातील पहिली इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) बसवली आहे. ही सिस्टिम जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) सुट्टीच्या दिवशी सरासरी 40 हजार ते 60 हजार वाहनांच्या रंगात रांगा पाहायला मिळतात. यामुळे वाहन चालक आणि प्रवासी बेजार होऊन जातात. वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठीच एमएसआरडीसी ने एआयचा वापर करण्याचे ठरवले आहे. येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एमएसआरडीसीकडून इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई पुणे महामार्गावर पहिल्या टप्प्यासाठी 95 किमी अंतरापर्यंत 39 ग्रँटी बसवण्यात आल्या आहेत. तसेच 218
आर्टिफिशियल इंजेलिजेंस कॅमेरेही बसवले गेले आहेत. ज्यामुळे 17 प्रकारचे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. बसवण्यात आलेले सर्व कॅमेरे आणि टोल बूथवरील कॅमेरे वाहनांच्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळखण्याचे काम करतील. या नंबर प्लेटच्या साह्याने ई-चलन जारी करण्यात येईल.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) सर्व एन्ट्रीमध्ये वाहनांसाठी वेट-इन मोशन मशीन असेल. तर 11 ठिकाणी हवामान निरिक्षण यंत्रणा काम करेल. त्याचबरोबर, या महामार्गावर टो व्हॅन, क्रेन, 36 आपत्कालीन वाहने ट्रॅकिंग सिस्टीम, अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध असेल. इथून पुढे वाहन चालकांना वाहतुकीचे माहिती कोणते रस्ते बंद आहेत, याचे अपडेट दिले जातील. या नव्या प्रणालीमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.