मुंबई – पुणे एक्सप्रेसवे म्हणजे राज्यातील दोन महत्वाच्या शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरून दरोरोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असते. या एक्सप्रेस वे वरून दररोज साधारणतः 40,000 गाड्या ये जा करत असतात तर वीकेंडला हाच आकडा 60 हजारापर्यंत जातो. मात्र या मार्गावर अनेकदा नियम न पाळल्यामुळे अपघात देखील घडतात . जुलै महिन्यात या मार्गावर ITMS प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने मोठा दंड या मार्गावरून वसूल केला आहे.
7 लाख 50 हजारांचा दंड वसूल
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वर गेल्या महिन्यात नव्याने सादर करण्यात आलेल्या ITMS म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लॉन्च झाल्यानंतर पहिलया पंधरा दिवसांतच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18 हजार 488 वाहनधारकांचे ई चलन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे. याद्वारे आतापर्यंत सात लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वेगनियंत्रणाच्या 90% केसेस
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी 19 जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास 90% केसेस या गाडी वेगात चालवल्याबद्दल. चार टक्के लेन कटिंग साठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की सीट बेल्ट न लावण्याबद्दल महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादीसाठी करण्यात आला आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरील वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.