हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai-Pune Missing Link Project । मुंबई आणि पुणे हि महाराष्ट्रातील २ मोठी शहरे.. एक शिक्षणाचे माहेरघर तर दुसरं नोकरीसाठी सर्वोत्तम शहर… दोन्ही शहरात राहणाऱ्या लोकांच्या संख्या जास्त असली तरी दोन्ही शहरातून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूप आहे. मात्र खंडाळा घाट परिसर आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे मुंबईवरून पुण्याला जायला खूप वेळ लागतो. साहजिकच, चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु आता चिंता करू नका, मुंबई-पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रोजेक्ट जवळपास ९४ टक्के पूर्ण झाला आहे. येत्या काही दिवसांतच हा पूल प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामुळे मुंबई ते पुणे नंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प (Mumbai-Pune Missing Link project) उभारण्यात आला आहे. मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. तसेच सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून वाहतूक सुपरफास्ट आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता.. यानंतर त्याला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत 2025 पर्यंत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांनी म्हंटल कि, नवीन मार्गामुळे एक्सप्रेस वेच्या घाट (टेकडी) भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या इंधनाची आणि वेळेची बचतही होईल.
काय आहेत वैशिष्ट्ये? Mumbai-Pune Missing Link Project
या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे. यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा ठरू शकतो. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार आहे. प्रगत बांधकाम पद्धती आणि सुरक्षा व्यवस्था तंत्रज्ञान वापरून हा प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प (Mumbai-Pune Missing Link Project) सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे.