Mumbai Railway | आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात आता राज्यामध्ये सणांचा उत्सव सुरू आहे. नुकताच दसरा पार पडलेला आहे. आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेने (Mumbai Railway ) प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे गर्दी देखील होणार आहे. अनेक लोक हे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी हे बाहेरगावी जात असतात. आणि दिवाळीच्या वेळी ते त्यांच्या घरी जातात. अशावेळी प्रवास करताना खूप गर्दी असते.
रेल्वे प्रशासन आणि मुंबई पुणे सध्या शहरांमधून काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईवरून बिहारच्या गया येथे विशेष गाडी चालवणार आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल ते गया दरम्यान ही गाडी धावणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन महाराष्ट्रातील जवळपास नऊ रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे. आज आपण ही विशेष ट्रेन कशी असणार आहे. आणि कोण कोणत्या स्थानकावर थांबणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत.
लोकमान्य टिळक टर्मिनल 1 या दरम्यान ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन 25 ऑक्टोबर पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही 23 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सोडण्यात येणार आहे ही. ट्रेन गया येथून 7 वाजता सोडली जाणार आहे, तर ती तिसऱ्या दिवशी लोकमान्य टर्मिनस येथे सकाळी 5: 50 मिनिटांना पोहोचणार आहे.
रेल्वे कोणत्या स्थानकावर थांबणार ? | Mumbai Railway
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन महाराष्ट्रातील कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वरदा, नागपूर, गोंदिया या 9 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकांना या रेल्वेचा खूप चांगला फायदा होणार आहे.