मुंबईची कोंडी फुटणार ! ‘मिनिटांत मुंबई’, 7 रिंग रोड, काय आहे MMRDA चा मास्टर प्लॅन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशाची आर्थिक राजधानी, कधीही नं झोपणारं शहर, चंदेरी दुनिया, अशी अनेक बिरुदं मिरवलेलं मुंबई हे शहर आता गर्दीने गच्च भरलेलं, तासंतास वाहतूक कोंडीमध्ये अडकणारं शहर ही मुंबईची विरोधी ओळख होऊ लागली आहे. काही कामानिमित्त्त बाहेर पडायचे झाल्यास २ तास आधी बाहेर पडले तरच व्यक्ती दिलेल्या वेळेत पोहचू शकतो अशी मुंबईची अवस्था झाली आहे. मुंबईची हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने खास योज़न तयार केली असून यासाठी MMRDA ने तब्बल ५८,५१७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे चला जाणून घेऊया…

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नेमकं काय ?

आता तूम्हालाही प्रश्न पडला असेल कोंडी फोडणार म्हणजे नेमके काय ? तर मुंबईतील ट्राफिक कमी करण्यासाठी या योजनेअंतर्गत मुंबईत 90 किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार असून यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भूयारी मार्गांचा समावेश असणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत. हे सातही रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर 59 मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकणार आहेत. याबरोबरच मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे.

याबाबत माहिती देताना एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की , या प्रकल्पांद्वारे मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. मुंबईकर एका तासाच्या आत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. आम्ही ही योजना मांडताना ‘मिनिटांत मुंबई’ असं म्हणतो याचा अर्थ मुंबईकरांना कुठेही जाण्यासाठी ५९ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लगता कामा नये.

रिंग रोड आणि मार्ग

  • पहिला रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – कोस्टल रोड – वरळी – शिवडी कनेक्टर – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल –नरीमन पॉईंट असा असेल.
  • दुसरा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड – पश्चिम द्रुतगती महामार्ग
    -पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल
  • तिसरा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – पश्चिम द्रुतगती महामार्ग – जेव्हीएलआर – कांजुरमार्ग जंक्शन – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • चौथा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – गोरेगाव मुलुंड लिंक रोड – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • पाचवा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – भायंदर फाउंटेन कनेक्टर – गायमुख घोडबंदर टनल – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर – साकेत फायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • सहावा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – मीरा भायंदर लिंक रोड – अलिबाग विरार कॉरिडोर – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर साकेत फ्लायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • सातवा (आऊटर) रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वर्सोवा दहिसर भयंदर लिंक रोड – उत्तण लिंक रोड – वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे – अलिबाग विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर – अटल सेतू जेएनपीटी – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.