Mumbai Sea Level Rise | 2040 पर्यंत मुंबईचा 10 टक्के भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Sea Level Rise | यावर्षी जुलै महिन्यात दरवर्षीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. आणि यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु जर आता या समुद्राच्या पाण्याच्या पातळी जास्त वाढ झाली, तर मुंबई शहराला याचा खूप मोठा धोका बसू शकतो. अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. जर समुद्राच्या पाण्याची पातळी (Mumbai Sea Level Rise) ही त्याच क्षमतेने वाढत राहिली, तर मुंबईचा जवळपास 10 टक्के भाग हा पाण्याखाली जाईल, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईसोबत पणजी आणि चेन्नईला देखील हा धोका आहे.

याबाबत एक अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या अभ्यासात समुद्रकिनारी असलेल्या देशातील जवळपास 15 शहरांना धोका असल्याचे सांगितलेले आहे. आणि त्या शहरांची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, मंगळुरू, कोची, विशाखापटनम, कोझिकोड हल्दीया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडपी, पारादीप, तुतुकुडी यांचा समावेश आहे.

सध्या हवामान बदल आणि पावसाची क्षमता जास्त असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे आता 2040 पर्यंत मुंबईच्या जवळपास 10 टक्के भाग हा पाण्याखाली जाणार आहे. अशी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे 2040 पर्यंत मुंबई पुद्देचेरीतील यानम आणि तमिळनाडूमधील तुतुकुडी मधील 10 टक्के पेक्षा अधिक जमीन ही पाण्याखाली जाऊ शकते.त्याचप्रमाणे चेन्नई मधील देखील पाच ते दहा टक्के जागा ही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

2040 च्या शेवटपर्यंत या शहरांमधील पाण्याची पातळी वाढणार असल्याचा धोका देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे समुद्राच्या आजूबाजूला असणारी लोक यांना देखील हा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या पश्चिम बंगालमधील हलदीया समुद्राच्या पातळीत ही 2.726 सेंटीमीटर एवढी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे विशाखापटनम मध्ये 2.381 cm कोचीमध्ये 2.213 सेंटीमीटर पारादीपमध्ये 0.717 सेंटीमीटर आणि चेन्नई मधील समुद्र पातळी 0.679 मीटर एवढी वाढ नोंद करण्यात आलेली आहे