Mumbai To Jalna Vande Bharat : मराठवाड्यात वंदे भारत ट्रेनचा विस्तार; या 2 शहरांना जोडणार

Mumbai To Jalna Vande Bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन Mumbai To Jalna Vande Bharat । मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता थेट परभणी आणि नांदेड पर्यंत धावणार आहे. त्यामुळे आता परभणी आणि नांदेडकरांना सुद्धा वंदे भारतने प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील रेल्वेजाळे आणखी वाढले तसेच आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. अखेर प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने 12 जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.

मुंबई ते नांदेड वेळापत्रक कस असेल ? Mumbai To Jalna Vande Bharat

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी 1.10 वाजता
दादर – दुपारी 1.17 वाजता / दुपारी 1.19 वाजता
ठाणे – दुपारी 1.40 वाजता/ दुपारी 1.41 वाजता
कल्याण – दुपारी 2.04 वाजता / 2.06 वाजता
नाशिक रोड – दुपारी 4.18 वाजता/ दुपारी 4.20 वाजता
मनमाड जंक्शन – सायंकाळी 5.18 वाजता / सायंकाळी 5.20 वाजता
अंकाई – सायंकाळी 5.50 वाजता
छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी 7.05 वाजता / सायंकाळी 7.10 वाजता
जालना – रात्री 8.50 वाजता/ रात्री 8.07 वाजता
परभणी – रात्री 9.43 वाजता/ रात्री 9.45 वाजता
हुजूर साहिब नांदेड – रात्री 11.50 वाजता

नांदेड ते मुंबई वेळापत्रक पहा –

हुजुर साहिब नांदेड – पहाटे 5.00 वाजता
परभणी – पहाटे 5,40 वाजता / पहाटे 5.42 वाजता
जालना – सकाळी 7.20 वाजता / सकाळी 7.22 वाजता
छत्रपती संभाजीनगर – सकाळी 8.13 वाजता/ पहाटे 8.15 वाजता
अंकाई – सकाळी 9.40 वाजता
मनमाड जंक्शन – सकाळी 9.58 वाजता/ सकाळी 10.03 वाजता
नाशिक रोड – सकाळी 11 वाजता/ सकाळी 11.02 वाजता
कल्याण जंक्शन – दुपारी 1.20 वाजता/ दुपारी 1.22 वाजता
ठाणे – दुपारी 1.40 वाजता/ दुपारी 1.42 वाजता
दादर – दुपारी 2.08 वाजता / दुपारी 2.10 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी 2.25 वाजता

एकीकडं मुंबई ते जालना वंदे भारतचा (Mumbai To Jalna Vande Bharat) विस्तार झाल्याने नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असला तरी दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील प्रवाशांना मात्र वेळेचा फटका बसणार आहे. हि ट्रेन नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना थोडा उशीर होईल.