Mumbai Water metro : मुंबईतील वाहतुकीत नवा जलमार्ग! ‘वॉटर मेट्रो’चं लवकरच साकारणार स्वप्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Water metro : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने ‘वॉटर मेट्रो’ सारखा अत्याधुनिक जलवाहतूक प्रकल्प साकारण्याची तयारी सुरू केली आहे. कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, जलमार्गांचा प्रभावी वापर करून मुंबईच्या (Mumbai Water metro) वाहतुकीला नवी दिशा देण्याचा सरकारचा मानस आहे.

महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश शहरातील (Mumbai Water metro) वाहतूक कोंडी कमी करून जलमार्गांचा प्रभावी वापर करणे आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी माहिती दिली की, कोची वॉटर मेट्रोकडून प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR) तयार करण्यात येणार असून, तो एप्रिल अखेरपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या 50-50 भागीदारीत उभारण्यात येणार असून, यासाठी स्वतंत्र (Mumbai Water metro) संस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई ही सात बेटांनी बनलेली महानगर असूनही, जलमार्गांचा पुरेपूर वापर आजवर झाला नाही. त्यामुळे वॉटर मेट्रोद्वारे उपनगरी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बॅटरीवर चालणाऱ्या बोटींच्या साहाय्याने वैतरणा नदी, वसई, ठाणे, मनोरी, पनवेल व मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा भागांना जोडणारे 21 संभाव्य वॉटर मेट्रो स्थानक ओळखण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ‘रो-रो फेरी सेवा’ सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने सुद्धा जलमार्गाने प्रवास करू शकतील.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवी मुंबई विमानतळावरून देशातील (Mumbai Water metro) पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येथे वॉटर मेट्रो टर्मिनल उभारण्याचे नियोजन असून, सिडको, MMB आणि राज्य बंदर मंत्रालय यांच्यात लवकरच बैठक होणार आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मुंबईच्या पर्यटनालाही मोठा बूस्ट मिळणार आहे. किल्ले, वॉटर पार्क, पक्षी निरीक्षण केंद्रे आणि धार्मिक स्थळांशी जोडणारे पर्यटन सर्किट तयार केले जाणार आहे. याशिवाय (Mumbai Water metro) जलसाठ्यांची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापन हे प्रकल्पाचे महत्वाचे भाग असतील. मुंबईतील नागरिकांसाठी ही एक नवी आशा आहे. वॉटर मेट्रोमुळे जलमार्गांचा पुरेपूर वापर करत, शहरी वाहतूक आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांना नवे वळण मिळेल.