मुंबईतील ‘हा’ ऐतिहासिक बंगला तब्बल 276 कोटी रुपयांना विकला; नवीन मालक कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नेपियन सी रोडवरील ऐतिहासिक लक्ष्मी निवास बंगला नुकताच विकला गेला आहे. हा बंगला आता मुंबईतील सर्वात महागडा विक्री व्यवहार ठरला आहे. 276 कोटी रुपये (2,760,000,000 रुपये) किमतीला विकलेल्या या बंगल्याची विक्री रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. हा बंगला फक्त त्याच्या भव्यतेसाठी नाही, तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठीही ओळखला जातो. 1940 च्या दशकात भारत छोडो आंदोलनाच्या काळात स्वातंत्र्यसैनिकांसाठी हा बंगला गुप्त आश्रयस्थान म्हणून वापरण्यात आला होता.

लक्ष्मी निवास बंगल्याचे विशेष महत्व –

राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि अरुणा असफ अली यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी या बंगल्यात आश्रय घेतला होता. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओसाठी या बंगल्याचा वापर प्रक्षेपण केंद्र म्हणूनही झाला होता.संपत्तीच्या 19,891 चौरस फुटांवर बांधलेल्या या बंगल्याची मालकी कपाडिया कुटुंबाकडे होती, ज्यांनी ही संपत्ती वागेश्वरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना विकली आहे . वागेश्वरी इंडस्ट्रीजच्या संचालक इलिना निखिल मेस्वानी यांची ओळख रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक निखिल मेस्वानी यांच्या पत्नी म्हणून केली जाते. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी 28 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी जोडलेली वास्तू –

रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या स्थळावर 45,000 चौरस फुटांचं बिल्ट-अप क्षेत्र उभारण्याची क्षमता आहे, ज्यामुळे भविष्यात इथे मोठ्या प्रमाणावर विकास होण्याची शक्यता आहे. कपाडिया कुटुंबाने 1917 साली एक पारशी कुटुंबाकडून 1.20 लाख रुपयांमध्ये हा बंगला खरेदी केला होता. त्यानंतर 2025 मध्ये या ऐतिहासिक वास्तूची विक्री होऊन ते एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. लक्ष्मी निवास बंगला केवळ एक वास्तू नसून, एक ऐतिहासिक धरोहर आहे, जी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी जोडलेली आहे.