हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचा वडापाव म्हंटल कि नक्कीच आपल्या तोंडाला चव सुटते. आपल्याकडे अलीकडच्या काळात पाश्चिमात्य पदार्थांचा म्हणजेच बर्गर, पिझ्झा यांचा वावर अलीकडे वाढला असला तरी मराठमोळ्या माणसाला वडापावच प्रिय असतो.. कमी पैशात उपलब्ध असणारा आणि माणसाची भूक भागवणारा, गरिबांना परवडणारा म्हणून वडापाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. आता याच वडापावची प्रसिद्धी अगदी सातासमुद्रापार गेली आहे. कारण मुंबईच्या वडा पावने जगातील सर्वोत्तम सँडविचमध्ये 19 वे स्थान पटकावले आहे.
लहान विद्यार्थी असो वा मोठमोठे सेलेब्रेटी असो, वडापाव खाण्याचा मोह कोणालाच सुटत नाही. सर्वांचा आवडता स्नॅक्स असलेल्या आणि पोटाला तृप्त करणाऱ्या वडापावचा डंका दुसऱ्या देशात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. प्रसिद्ध ट्रॅव्हल गाईड प्लॅटफॉर्म स्वाद ऍटलस जे आपल्या पाककलेच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यांनी ‘जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविच’ ची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये मुंबईच्या वडापावने जगात १९ वा क्रमांक मिळवला आहे. वडापाव शिवाय या यादीत दुसऱ्या कोणत्या पदार्थांचा समावेश करण्यात आलेला नाही. या यादीत बान्ह मी, टॉम्बिक डोनर आणि शावरमा हे पदार्थ आघाडीवर आहेत.
कसा लागला वडापावचा शोध –
1960 आणि 1970 च्या दशकात दादर रेल्वे स्थानकाजवळ काम करणाऱ्या अशोक वैद्य नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याने प्रथम वडापाव बनवला. त्यांनी भुकेल्या कामगारांना तृप्त करण्याची सर्वसामान्यांना परवडेल, पॉट भरेल आणि मन तृप्त अशी डिश तयार केली, जी बनवायला सुद्धा सोप्पी आणि चवीला झणझणीत अशी आहे, त्यालाच वडापाव म्हंटल गेलं… तेव्हापासून आजतागायत वडापाव हा सर्वात प्रसिद्ध नाश्ताचा पदार्थ ठरला आहे. अजूनही लोकांमध्ये वडापावची क्रेझ कायम आहे.




