हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे, एक्सरसाइज न केल्यामुळे तसेच धूम्रपान आणि मद्यसेवन केल्यामुळे लिव्हर (Liver) खराब होते. आपल्या शरीरात लिव्हर रक्त शुद्ध करण्यापासून ते अनेक महत्त्वाची कामे करत असते. परंतु लिव्हरवरच काम करायचे बंद झाले तर त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे लिव्हर नेहमी चांगले ठेवण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचे सेवन करून. हे ड्रिंक नेमके कसे बनवायचे?? त्याचे फायदे काय?? याविषयी जाणून घ्या.
ड्रिंक बनवण्याची पद्धत
मनुके खाणे शरीरासाठी चांगले असते हे आपल्याला अनेकवेळा डॉक्टरांकडून सांगितले जाते. तसेच मनुक्याचे पाणी पिणे (Munakka Drink) ही शरीरासाठी लाभदायी ठरते. या पाण्याचे सेवन केल्यामुळे फक्त तीन दिवसात लिव्हर दिवस स्वच्छ होते. परंतु हे ड्रिंक बनवण्याची एक प्रोसेस आहे. मनुक्याचे ड्रिंक तयार करण्यासाठी 2 कप पाणी आणि 150 ग्रॅम काळे मनुके घ्या. पुढे हे मनुके चांगले धुवून घ्या. त्यानंतर दोन कप पाणी उकळवायला ठेवा आणि त्यात मनुके घाला. या पाण्याला 20 मिनिटे उकळवा. आता हे पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर प्या.
मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे
मनुक्याचे पाणी पिल्यामुळे फक्त 3 दिवसांमध्ये तुमचे लिव्हर स्वच्छ होईल. या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. मनुक्यात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स ही असतात. त्यामुळे ते खाणे शरीरासाठी चांगले असते. मनुक्याचे पाणी दररोज अनोशा पोटी पिल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात.
या पाण्याचे सेवन कधी करावे??
अनोशा पोटी हे पाणी पिलेले कधीही चांगले. परंतु पाणी पिण्याअगोदर त्यातील वेगळे काढा. त्यानंतर हे पाणी पिऊन टाक. या पाण्यात भिजवलेले मनुकेही तुम्ही खाऊ शकता. फक्त तीन दिवस तुम्ही हे पाणी रेगुलर पिला तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होईल. थकवा जाणवणार नाही. तसेच, इतर आजारही नाहीसे होतील.