महापालिकेकडे आता फक्त दोन हजार लसींचा साठा उपलब्ध

corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | तालुका शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. लसीकरण मोहिमेला शहरातील वेगवेगळ्या भागातून चांगला लहान मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. अशात लसीकरणा करिता केवळ दोन हजार लसींचा साठा शिल्लक आहे. शनिवारी केवळ दोन हजार लसी उपलब्ध असल्याने सोमवारपर्यंत लसी उपलब्ध नाही झाला तर लसीकरणासाठी अडचण निर्माण होणार आहे.

शहरात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून दररोज 13 ते 15 हजारापर्यंत लसीकरण होत आहे. काल विक्रमी 17 हजार एवढे लसीकरण झाले होते. तर शनिवारी 18 हजार 148 जणांनी लसीकरण केले. असे असतानाच आता लसीचा साठा संपत आल्याने लसीकरण संकटात आले आहे.

गेल्या आठवड्यात महापालिकेने 52 हजार लसी उपलब्ध होत्या. शनिवारी सकाळी महापालिकेकडे 2 हजार लसी उरल्या होत्या. दिवसभरातील त्यापैकी 18 हजार 148 लसी संपल्या शनिवारी सायंकाळनंतर महापालिकेकडे केवळ 2 हजार लसीचा साठा शिल्लक आहे.