औरंगाबाद | औरंगाबादेतील गरीब व होतकरू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या चार शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उस्मानपुरा ,जवाहर कॉलनी, मयुरबन कॉलनी, गारखेडा या भागातील मनपाच्या शाळांमध्ये ही सोय केली जाणार असून जुलैअखेर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातील अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगले यांनी दिली.
प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काही दिवसापूर्वीच पालिकेच्या शाळेतील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता या चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहे.
प्लेग्रुप के यूकेजी सुरू करणार
जुलै अखेरीस या चार शाळांमध्ये सीबीएससीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी मुलांना मोफत प्रवेश दिले जाणार असून ज्या मुलांना सीबीएससी मधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांनी प्री प्रायमरीच्या प्लेग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी मध्ये प्रवेश दिला जाईल. मनपाच्या शाळातील शिक्षक देखील अत्यंत हुशार व लोकप्रिय विद्यार्थीप्रिय आहेत. पालिकेच्या अनेक शाळांचा निकाल देखील चांगला लागला आहे. या शिक्षकांमधूनच 25 ते 30 शिक्षक सीबीएससीचे वर्ग घेण्यासाठी निवडले आहेत. हे शिक्षक सीबीएससी अभ्यासक्रम शिकवतील.