शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई सुरूच आहे. भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव देण्यात यावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्याने दोन वेळा दिले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी एक कोटी 81 लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला आहे. हा निधी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला. त्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. भूसंपादनासाठी त्रिसदस्यीय समितीने पाहणीही केली. पाहणीनंतर देवळाई चौक ते रेल्वेगेट दरम्यान दोन्ही बाजूंनी सुमारे दिडशे फूट लांब व 24 मिटर रुंद भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

पण अद्यापही प्रक्रिया सुरू झालेली नाही. महापालिकेकडून भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणे गरजेचे आहे. भूसंपादन अधिकाऱ्याकडून दोनवेळेस पत्रव्यवहार होऊन देखील महापालिका प्रशासनाकडून सुधारीत प्रस्ताव पाठविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment