Municipal Corporations Election Date : महापालिका निवडणुका या तारखेला होणार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Municipal Corporations Election Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Municipal Corporations Election Date : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल आता वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. आजपासून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कि, या सर्व २९ महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन देण्यात येईल, निवडणुकीचे अर्ज समक्षच भरावे लागतील. उमेदवारांना ६ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागेल. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. काही महापालिका क्षेत्रात संभाव्य दुबार मतदारांची संख्या जास्त आहे. अशा मतदारांसमोर डबल स्टार असणार आहे. मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान बाळ असलेल्या महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध असतील. वीज, सावली, सौचालयाची सुविधा उपलब्ध असेल. मतदानाच्या आधी ४८ तास प्रचारावर बंदी असेल. या निवडणुकीसाठी एकूण 3.48 कोटी मतदार मतदानात सहभागी होतील. 39,147 मतदान केंद्रावर हे मतदान होईल. 11,349 कंट्रोल युनिट आणि 22,000 बँकेत युनिट काम करतील. Municipal Corporations Election Date

महत्वाच्या तारखा Municipal Corporations Election Date

अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६

निवडणूक अधिकारी म्हणून २९० निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ८७० सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. ४८ तास आधी प्रचारावर निर्बंध असणार आहे. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्तांनी दिली