मनपा निवडणूक: शहरात 42 प्रभाग, 126 वॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका काल निकाली निघाल्या मुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर 2019 मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात 126 वॉर्ड तयार केले, 42 प्रभागाचा आराखडा सादर केला.

नवीन आराखड्यानुसार एक वार्ड नऊ ते दहा हजार लोकसंख्येच्या असेल. तीन वॉर्डाच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास 30 हजार असेल. राज्य निवडणूक आयोगाने 3 नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यातील 22 महापालिकांसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढला. औरंगाबाद महापालिकेलाही नोव्हेंबर महिन्यात कच्चा आराखडा तयार करून आयोगाकडे सादर करावा असे म्हटले. मनपा प्रशासनाने आराखडा सादर केला आहे. पूर्वी मनपातील सदस्य संख्या 115 होती आता 126 करण्यात आली असून प्रभागांची संख्या 42 झाली आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार 2286 प्रगणक गट असल्यामुळे त्यातूनच वाद व प्रभाग तयार केले. 12 लाख 28 हजार 32 लोकसंख्या 9 लाख 39 हजार 458 मतदार संख्या गृहित धरली.

126 वॉर्डन पैकी 63 वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. नवीन प्रभाग रचनेत 24 एससी, 3 एसटी, 34 ओबीसी व 65 सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य राहतील. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय प्रक्रिया अशक्य आहे. आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील आक्षेप व सूचना विचारात घेऊन प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर आरक्षण सोडत होईल.

2015 मधील पक्षीय बलाबल –
शिवसेना – 29
भाजप – 23
एमआयएम – 24
अपक्ष – 17
कॉंग्रेस – 11
बसप – 5
राष्ट्रवादी – 4
रिपाइं (डेमोक्रॅटिक) – 2
एकूण – 115

Leave a Comment